शाळेची आठवण आणि Dopamine😇
आज सहजच संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा मारत असताना विषय निघाला की,आता आपण शाळेमध्ये असतो तर किती छान वाटलं असतं. खरं तर समोरुन शाळेतून घरी निघालेली काही मुलं बघतल्यावर हा विषय निघाला. मात्र आज यामुळे एखादया प्रेमभंग झालेल्या प्रियकराला आपल्या प्रियसीची जशी आठवण येत रहावी अगदी तशी राहून राहून शाळेची आठवण येत होती.
ते लहानपण आणि ती शाळा हे जरी नुसत आठवलं तरी मानात डोपामीनचा पाउस पडतो. शाळेत असताना वाटायचं की कधी एकदा या शाळेतून बाहेर पडून College ला जातोय ते. पण आता college ला आल्यावर शाळेची किंमत कळतेय. पण दुःख याचं की आता फक्त आठवणी काढत डोपामीन realise करत बसायचं.
ते म्हणतात ना "गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी."
Comments
Post a Comment